*श्रीपांडुरंगो भवतु प्रसन्नः (भाग ६)*

आज आषाढी एकादशी भगवंत-भक्ताचा उत्सव. इतर अनेक उत्सव मग ते अवतार दिन असतील अथवा अधर्मावर धर्माचा विजय मिळवलेले दिवस असतील ते आपण गोड-धोड, पंक्वान्न बनवून, गुढ्या-पताका, तोरणे लावून साजरे करतो. आजचा दिवस मात्र केवळ भगवंताच्या अनुसंधानात घालवावा असाच असतो. कारण इतर उत्सवात आपण भगवंत सोडून इतर अनेक गोष्टींमध्ये अडकू शकतो अशी साजरी करण्याची पद्धतच आज …

Continue reading *श्रीपांडुरंगो भवतु प्रसन्नः (भाग ६)*

*श्रीपांडुरंगो भवतु प्रसन्नः (भाग ५)*

संत पुरंदरदासांचे दैवत पंढरपूर येथील पांडुरंग होते. केवळ आणि केवळ भक्तासाठी विटेवर उभे ठाकलेले हे परब्रह्म परमात्म्याचे रूप भक्तांचे सर्व हट्ट आजंही पुरवत आहे.   पांडुरंग या अवताराबद्दल अनेक मतभिन्नता दिसत असली तरीही संत सत्पुरूषांनी ज्याप्रकारे त्याला केंद्रस्थानी ठेवून ते दैवत मानले आहे ते लक्षात घेता त्यामागे तथ्य नाही असे म्हणता येणार नाही. संशोधकांच्या कार्यात …

Continue reading *श्रीपांडुरंगो भवतु प्रसन्नः (भाग ५)*

*श्रीपांडुरंगो भवतु प्रसन्नः (भाग ४)*

आषाढी एकादशी निमित्त पुरंदरदासांच्या ज्ञात-अज्ञात अशा काही अभंगांचा अर्थ आपण पाहत आहोत. आज दासांच्या संगीत योगदाना बद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.   अचल विठ्ठल दास म्हणून ८व्या ९व्या शतकात एक दास होऊन गेले असा उल्लेख आढळतो पण त्यांच्या जीवनाबद्दल अथवा साहित्याबद्दल अधिकृत माहिती मिळत नाही. तामिळनाडूमध्ये अळवार यांनी भगवंतावर रचना केल्या होती. महाराष्ट्रातही तोपर्यंत म्हणजे …

Continue reading *श्रीपांडुरंगो भवतु प्रसन्नः (भाग ४)*

श्रीपांडुरंगो भवतु प्रसन्नः (भाग ३)

कर्नाटकातील भक्ती सांप्रदायात सिंहाचा वाटा संत पुरंदरदासांचा आहे. आज जी काही भगवद्संकीर्तनाची परंपरा दक्षिण भारतात टिकून आहे त्याचा पाया पुरंदरदासांनी भक्कम केला म्हणूनच. ४ लाख ७५ हजार अभंग रचना या पायावरच दक्षिणेतील संगीत परंपरा टिकून आहे. कर्मकांडी अति कर्मठ लोकांनी तोडलेला समाज जोडण्याची सुरूवात श्रीपादराज स्वामींनी कानडीत पदे रचून केली तीच परंपरा पुढे संत पुरंदरदासांनी …

Continue reading श्रीपांडुरंगो भवतु प्रसन्नः (भाग ३)

श्रीपांडुरंगो भवतु प्रसन्नः (भाग २)

दास परंपरेतील सर्वच दासांचे साहित्य पाहिले तर त्याचे अनेक भाग करता येतील. काही रचना त्यांच्या जीवनाबद्दल व्यक्तित्वाबद्दल सांगून जातात, काही तत्कालीन परिस्थितीचे वर्णन घडवतात, काही केवळ अंतरंग अनुभवांशी निगडीत आणि साधना मार्गात मार्गदर्शन करतात, काही स्थान क्षेत्र महात्म्य सांगतात तर काही कीर्तनप्रधान असतात. संत पुरंदरदासांच्या रचनांमध्ये मात्र वरील सर्व पैलूंचे दर्शन घडते. प्रस्तुत रचना  ही …

Continue reading श्रीपांडुरंगो भवतु प्रसन्नः (भाग २)

श्रीपांडुरंगो भवतु प्रसन्नः (भाग १)

महाराष्ट्रात सर्वांनाच वेध लागले आहेत ते पंढरपुरी उभे असलेल्या गोपाल कृष्ण रूपी विठ्ठलाचे. महाराष्ट्रातील वारीची परंपरा पाहिली की मन शेकडो वर्ष मागे जातं जेव्हा कर्नाटकातून दास देखील भगवद्गुण संकीर्तन करत करत पंढरपुरी यायचे. भेदा-अभेदा पलिकडील भगवद्भक्तीचा अमृतानुभव महाराष्ट्र आणि कर्नाटकातील संत तेव्हा मुक्तहस्ते वाटयचे. हरी ही भवसागर तरून नेणारी केवळ दोन अक्षरे सर्वांच्याच मुखी असून …

Continue reading श्रीपांडुरंगो भवतु प्रसन्नः (भाग १)