मध्वाचार्यांच्या तत्त्ववादाचा भक्तीवेल – हरिदास सांप्रदाय

भक्ती ही भगवंताच्या महात्म्य ज्ञानातून येते. त्यातूनच ती दृढ होत जाते. भगवंताशी असणारा असा सर्वधिक स्नेहाचा बंध म्हणजेच भक्ति. – श्रीमध्वाचार्य

 

भक्तीची ही सहज सोपी व्याख्या आचार्यांनी जशी सांगितली तशीच ती कृतीतही आणून दाखवली आणि जनमानसात भक्ति रूजावी म्हणून भगवंताचे महात्म्य गाणे सुरू केले. यातूनच हरिदास पंथाचा पाया रचला गेला.